नाकाबंदीत नागरिकांना त्रास दिल्याने ग्रामीणचे चार पोलीस निलंबित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नाकाबंदीत नागरिकांना त्रास दिल्याने ग्रामीणचे चार पोलीस निलंबित

सोलापूर  : नाकाबंदीत वाहनचालक, इतर नागरिकांना त्रास दिल्यामुळे चार पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. तीन पुरुष एक महिला असे चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना पोलिस मुख्यालयात हजेरी राहील. त्यांची चौकशी होईल, असे अधीक्षक सातपुते यांनी सांगितले.

टेंभुर्णी पोलिस हद्दीत नाकाबंदीत वाहनचालकांना पैसे मागितल्याची तक्रार अधीक्षक यांच्याकडे आली होती. सातपुते यांनी ऑनलाइन पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधून बंदोबस्ताचा आढावा घेतला.शनिवारी रात्री ते पुढील आठ दिवस संचारबंदी अंमल आहे. मुख्य महामार्ग, अंतर्गत शहरांना जोडणारे रस्ते याठिकाणी नाकाबंदी. आंतरराज्य नाकाबंदीत कडेकोट बंदोबस्त दिल्याची माहिती अधीक्षक सातपुते यांनी दिली. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन केले जाईल. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवा या कामासाठीच नागरिकांनी रस्त्यावर यावे. अन्यथा कारवाई केली जाईल. संचारबंदी नियमाचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन केले आहे.