धोनीपेक्षा पंत सुपरफास्ट, विदेशात नोंदवला अनोखा विक्रम

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

धोनीपेक्षा पंत सुपरफास्ट, विदेशात नोंदवला अनोखा विक्रम

टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने इंग्लंडविरुद्ध लॉर्डसच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 58 चेंडूत 37 धावांची खेळी केली. पंतने रवींद्र जाडेजासोबत मिळून संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या खेळीदरम्यान पंतने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी याचा विक्रम मोडला आहे.

रिषभ पंतने लॉर्डसवर खेळलेल्या छोट्या खेळीदरम्यान विदेशातील आपले 1 हजार रन्स पूर्ण केले. पंतने 23 व्या कसोटीत 37 व्या डावात आतापर्यंत 1465 धावा केल्या असून यातील 1005 धावा या विदेशातील आहेत. विदेशात सर्वात वेगवान 1 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम पंतने केला असून त्याने धोनी आणि फारूख इंजिनिअर यांना मागे सोडले आहे.

विदेशात सर्वात वेगवान 1 हजार धावा करणारे यष्टीरक्षक

1. रिषभ पंत - 29 डाव

2. महेंद्रसिंह धोनी - 32 डाव

3. फारुख इंजिनिअर - 33 डाव

विदेशात सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक

1. महेंद्रसिंह धोनी - 2496 धावा

2. फारुख इंजिनिअर - 1209 धावा

3. सैयद किरमानी - 1109 धावा

4. रिषभ पंत - 1005 धावा*