ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा : युक्रेनला नमवून भारत उपांत्य फेरीत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा : युक्रेनला नमवून भारत उपांत्य फेरीत

गतवर्षी संयुक्त विजेतेपद पटकावणाऱ्या भारताने बरोबरीची कोंडी फोडणाऱ्या निर्णायक अतिजलद (ब्लिट्झ) लढतीत युक्रेनवर - असा दणदणीत विजय मिळवूनफिडेबुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. भारताच्या विजयात द्रोणावल्ली हरिकाच्या तीन विजयांचा सिंहाचा वाटा आहे. आता मंगळवारी भारताची अमेरिकेशी गाठ पडणार आहे, तर दुसरी उपांत्य लढत चीन आणि रशिया यांच्यात होईल.

उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या डावात भारताने युक्रेनचा - असा आरामात पराभव केला. परंतु दुसऱ्या डावात युक्रेनने .-. अशा फरकाने भारतावर मात केली. त्यामुळे बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या लढतीत भारताने युक्रेनला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. या लढतीमधील पहिल्या सामन्यात विदित गुजराथीने व्हेसली इव्हानच्यूकला बरोबरीत रोखले. मग दुसऱ्या सामन्यात बी. अधिबानने किरिल शेव्हचेन्कोवर विजय मिळवत भारताची आघाडी वाढवली. तिसऱ्या सामन्यात कोनेरू हम्पीने युलिजा ओस्माकशी बरोबरी साधली. त्यानंतर उर्वरित तीन लढतींमध्ये हरिका, निहाल सरिन आणि आर. वैशाली यांनी अनुक्रमे नतालिया बुस्का, प्लॅटन गॅलपेरिन आणि मारिया बेर्डनिक यांच्यावर विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.