देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय प्रभारी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय प्रभारी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

पणजी  : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पुढील वर्षी आयोजित गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी गोव्याचे निवडणूक प्रभारी तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे पणजी येथे आगमन झाले.
याशिवाय सह प्रभारी केंद्रीय संस्कृती,पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री गंगापूरम किशन रेड्डी तसेच केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जर्दोश देखील गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.पहिल्या दिवशी मान्यवरांनी डॉ मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी तसेच देवेंद्र फडणवीस, गंगापूरम किशन रेड्डी, दर्शना जर्दोश यांच्या उपस्थितीत सुकाणू समितीची बैठक झाली. यावेळी राज्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली. दोन दिवसांच्या दौऱ्यात गोवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक संघटनात्मक बैठक होणार आहेत.