देवेंद्र फडणवीस दबंग नेते - चंद्रकांत पाटील

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देवेंद्र फडणवीस दबंग नेते - चंद्रकांत पाटील

पुणे  : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमचे नेते देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत. ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. उद्धव ठाकरे यांच्या सारखे नाहीये. त्यांना काही माहित नसतंच काय चालू आहे आणि नंतर बोलतात की मला माहीतच नाही काय चालू आहे. देवेंद्र यांच्या वयावर जाऊ नका. पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे. सोपं नाही ते खूप वर्षा नंतर अस झाले आहे. तेव्हा देखिल शिवसेनेने खूप त्रास दिला आहे. तेव्हा देखील शिवसेनेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रयत्न केले होते की, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करायचे आणि असे प्रयत्न देखील झाले होते, असे देखील चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रकात पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी ती नाकारली. त्यानंतरच माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात. त्यामुळे त्यांना त्रास देण्याचे कल्चर आमचे नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा. माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असेही ते म्हणाले.