तालिबानला खुलं आव्हान देणाऱ्या महिला नेत्या कैदेत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तालिबानला खुलं आव्हान देणाऱ्या महिला नेत्या कैदेत

तालिबानविरोधात हातात शस्त्र घेणाऱ्या महिला नेत्या सलीमा माझरी यांना ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

जेव्हा बहुतांश अफगाणी नेत्यांनी देशातून पळ काढला त्यावेळी बल्ख परिसरात सलीमा तालिबानशी लढण्यासाठी खंबीरपणे उभ्या होत्या. जोपर्यंत त्यांचा जिल्हा चारकिंत तालिबान्यांच्या ताब्यात जात नाही, तोवर त्या लढत होत्या.

सलीमा या अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर आहेत ज्यांनी गेल्या काही काळापासून तालिबान्यांच्या विरोधात लढा दिला. तालिबान्यांना रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सलीमा माझरी यांनी स्वतःची सेना तयार केली होती. तालिबान्यांनी बल्ख प्रांतामधून सलीमा यांना ताब्यात घेतलं आहे.

तालिबानने अफगाणिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांना सामान्य माफीची घोषणा केली होती आणि त्यांना कामावर परतण्यास सांगितलं होतं, ज्यात महिलांचाही समावेश होतो. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तालिबानने अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. मात्र, चारकिंत जिल्ह्यामधून सलीमा लढत असल्याने तालिबानी तो जिल्हा ताब्यात घेऊ शकत नव्हते.