डार्लिंग’ याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

डार्लिंग’ याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

पुन्हा एकदा चित्रपटगृहांचे दरवाजे उघडणार असल्याचे जाहीर होताच हिंदीसह मराठीतील निर्मात्यांचीही खऱ्या अर्थाने लगीनघाई म्हणजेच आगामी चित्रपट प्रदर्शित करण्याची लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षभरापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा एकामागोमाग एक घोषित केल्या जात आहेत. करोनामुळे तारीख पे तारीख असा अनुभव वाट्याला आलेल्या प्रथमेश परब अभिनीत ‘डार्लिंग’ला अखेर प्रदर्शनाची निश्चित तारीख मिळाली आहे. हा चित्रपट याच वर्षी १० डिसेंबरला चित्रपटगृहातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘डार्लिंग’ हा चित्रपट घोषणा आणि मुहूर्तापासून सिनेसृष्टीबरोबरच प्रेक्षकांमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे. समीर आशा पाटील यांनी ‘डार्लिंग’चं दिग्दर्शन केलं आहे. समीर यांनी आजवर नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे विषय हाताळत मराठीच्या कक्षा रुंदावणाऱ्या चित्रपटांचं आपल्या अनोख्या शैलीत दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे अर्थातच ‘डार्लिंग’कडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘७ हॉर्स एन्टरटेन्मेंट प्रा. लि.’, ‘व्ही. पतके फिल्म्स’ आणि ‘कथाकार मोशन पिक्चर्स’च्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखिल खजिनदार यांनी के ली आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं कथानक या चित्रपटाचा खरा नायक आहे. या कथानकाला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अशी ओळख असलेला प्रथमेश परब नायक म्हणून लाभला आहे. तर या चित्रपटात प्रथमेशची ‘टकाटक’ चित्रपटातील जोडीदार रितिका श्रोत्रीच पुन्हा एकदा त्याची नायिका म्हणून झळकणार आहे. या निमित्ताने प्रथमेश-रितिका ही जोडी पुन्हा एकदा रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘लागीरं झालं जी’ आणि ‘कारभारी लयभारी’ फेम निखिल चव्हाणचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच ‘डार्लिंग’चं लेखनही समीर आशा पाटील यांनी केलं आहे. या सिनेमात प्रथमेश-रितिका-निखिल यांच्या जोडीला मंगेश कदम, आनंद इंगळे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीतकार चिनार-महेश या संगीतकार जोडीनं या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे