खुशखबर : पहिल्या दहा दिवसांतच पडला सरासरीपेक्षा अधिक पाऊस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

खुशखबर : पहिल्या दहा दिवसांतच पडला सरासरीपेक्षा अधिक पाऊस

मुंबई : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मोसमी पावसाने पहिल्या १०
दिवसांतच जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी ५०५ मिलीमीटर
इतकी असताना मुंबई उपनगरात 
यंदा १ ते ११ जूनमध्ये ५३४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पहिल्याच दिवशी ९ जूनला मुंबई उपनगरात
२०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला होता. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

पावसाची नोंद :
सांताक्रूझ : ३२.२६ मिलीमीटर 
अंधेरी : ५२.३२ मिलीमीटर 
बोरिवली : ३८.२ मिलीमीटर 
ठाणे : ८७.५ मिलीमीटर 
कल्याण : ३०.८ मिलीमीटर 
बेलापूर : २४.३ मिलीमीटर