टोक्योमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या दोन दिग्गजांचा आंतरराष्ट्रीय हॉकीला अलविदा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोक्योमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या दोन दिग्गजांचा आंतरराष्ट्रीय हॉकीला अलविदा

भारतीय हॉकीपटू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते रुपिंदर पाल सिंग आणि बीरेंद्र लाकरा यांनी गुरुवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे खेळातून निवृत्ती जाहीर केली. रुपिंदर पाल सिंगने २००८ मध्ये भारतीय हॉकी संघासाठी खेळण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने एकूण २२३ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर बीरेंद्र लकरा भारतीय संघासाठी २०१ सामने खेळला आहे. हॉकी इंडियाने ट्विटद्वारे त्याच्या निवृत्तीची माहिती दिली

पंजाबच्या फरीदकोटमध्ये जन्मलेल्या रुपिंदर पाल सिंगने दोन ऑलिम्पिकमध्ये (रिओ २०१६ आणि टोक्यो २०२०) भाग घेतला आहे तसेच आशियाई खेळ, आशिया कप, राष्ट्रकुल खेळ आणि हॉकी वर्ल्ड लीगमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. त्याची संपूर्ण कारकीर्द चमकदार राहिली आहे. ३० वर्षीय रुपिंदर पाल सिंगने भारताला टोक्यो २०२० मध्ये कांस्य पदक जिंकण्यास मदत केली. ४१ वर्षातील हे त्याचे पहिले ऑलिम्पिक पदक होते आणि तो याला आपले सर्वात मोठे यश मानतो. रुपिंदरने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन गोल केले, ज्यात जर्मनीविरुद्ध कांस्य पदकाच्या सामन्यादरम्यान निर्णायक पेनल्टी स्ट्रोकचा समावेश आहे.