टोक्यो पॅरालिम्पिक : प्रवीण कुमारला रौप्य पदक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोक्यो पॅरालिम्पिक : प्रवीण कुमारला रौप्य पदक

नवी दिल्ली : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी प्रकारात भारताच्या प्रवीण कुमारने रौप्य पदक पटकावले. प्रवीणने पुरुष उंच उडी टी ६४ स्पर्धेत ही कामगिरी केली आहे. तर, ग्रेट ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने .१० मीटरसह सुवर्णपदक कमावले. तसेच, पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने .०४ मीटरसह कांस्य पदक जिंकले.
उंच उडीत भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. या आधी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण ११ पदकांची लयलूट केली आहे. यात दोन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.