कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये CT-SCAN करू नका, एम्सच्या संचालकांनी सांगितलं 'कारण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये CT-SCAN करू नका, एम्सच्या संचालकांनी सांगितलं 'कारण

नवी दिल्ली: कोरोनाच्या नवीन लाटेमध्ये RT-PCR चाचणीत संसर्गाचा थांगपत्ता लागत नसल्याच्याही बऱ्याच घटना समोर आल्यात. त्यामुळे रुग्णांना सिटी स्कॅन (CT-SCAN) करावे लागतेय. परंतु आता एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी अशा रुग्णांना इशारा दिलाय. सिटी स्कॅन विचारपूर्वक करायला हवे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सीटी स्कॅन हे तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य आहे, हे अत्यंत हानिकारक आहे.  आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा

घरातील विलगीकरणात राहणारे लोक त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतात. सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी परिस्थिती आहे. आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा, असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय.

सर्वाधिक बाधित राज्यांव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये प्रकरणे वाढतीच 

जास्त बाधित राज्यांव्यतिरिक्त काही राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि मेघालय ही राज्ये बाधित आहेत, अशी माहिती गुलेरिया यांनी दिलीय.

  • रिकव्हरी दर चांगला

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी दरही सुधारत असल्याची माहिती मंत्रालयाने दिलीय. 2 मे रोजी रिकव्हरीचे प्रमाण 78 टक्के होते, जे 3 मे रोजी 82 टक्क्यांपर्यंत पोहोचले. काही गोष्टीवर आपल्याला सतत काम करावे लागेल. दिल्ली आणि मध्य प्रदेशात नव्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, जर आपण संपूर्ण देशातील कोरोना मृत्यूदर पाहिला तर ते अंदाजे 1.10 टक्के आहे.