दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आज जयंती आहे. गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते आजही जिवंत आहेत. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने वडिलांच्या आठवणीत त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वडील ऋषी कपूर यांच्यासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरलेल्याशर्माजी नमकीनचं फर्स्ट लूक आऊट झालंय.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजच्या जयंती दिनी त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलेल्याशर्माजी नमकीनचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. यात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा या चित्रपटातील फर्स्ट लूक आउट करण्यात आलाय. अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं, त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील बऱ्याच भागाचं शूट केलं होतं. ऋषी कपूर यांच्या या चित्रपटासाठी फॅन्स देखील गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. परंतू करोना परिस्थितीमुळे या चित्रपटाच्या रिलीजला उशिर झाला होता. हा चित्रपट गेल्याच वर्षी याच तारखेला रिलीज करण्यात येणार होता.

शर्मा जी नमकीनया चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सर्दीचा माहौल दाखवण्यात आलाय. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ऋषी कपूर यांनी जर्सी परिधान करत गळ्यात मफलर गुंडाळून अगदी मस्तीमध्ये चलताना दिसून येत आहेत. त्यांच्या हातात एक सूटकेस दिसून येतेय. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये त्याच लोकेशन आणि लूकमध्ये अभिनेते परेश रावल सुद्धा दिसून येत आहेत. खरं तर अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर उरलेल्या भागाचं शूट अभिनेते परेश रावल यांनी पूर्ण केलंय. अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनशर्माजी नमकीनचित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. त्यानंतर ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमाने सुद्धा त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर केलंय.