किसान रेल्वेची ४० कोटींची उलाढाल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

किसान रेल्वेची ४० कोटींची उलाढाल

सोलापूर : सोलापूर रेल्वे विभागातील किसान रेल्वेने गगन भरारी घेतली आहे. ऑगस्ट २०२१ पर्यंत सोलापूर विभागाने ४० कोटी ३६ लाख ४३ हजार ६२७ रुपयांची उलाढाल केली आहे. मध्य रेल्वेने पूर्ण केलेल्या सहाशे फेऱ्यातील जवळपास ४१३ फेऱ्या या केवळ सांगोला भागातून झाल्या आहेत. यात डाळिंब आणि इतर फळ व भाज्यांचा सहभाग आहे.
सांगोला - मुजफ्फरनगर, बंगळुरू- आझाद नगर आणि देवळाली मुजफ्फरनगर अशा तीन किसान रेल्वे सोलापूर विभागातून नाशवन्त मालाची वाहतूक करत आहे. या प्रत्येक रेल्वेतून अनेक टन माल बाहेरच्या राज्यात जातो. यात शेतकऱ्यांना वाहतूक भाड्यात ५०% सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी वाहतूक वाढली. १०० व्या फेरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमाच्या मदतीने हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली होती. त्याच रेल्वेने गेल्या काही महिन्यात कोट्यवधींची कमाई केली आहे. गेल्या काही महिन्यात ४२७ फेऱ्या, ५३ लाख ६० हजार १२४ पाकीट, ८९०७५९.९५ किलो इतका माल भरण्यात आला. त्यात १८ कोटी ४१ लाख ३२ हजार २६३ सवलत दिली तर ४० कोटी ३६ लाख ४३६३७ रुपयांचा महसूल मिळाला.