महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी! पार केला लसीकरणाचा मोठा टप्पा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी! पार केला लसीकरणाचा मोठा टप्पा

गेल्या साधारण दीड वर्षांपासून जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूपासून सुटका मिळवण्यासाठी सध्या लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहेत. भारतातही या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. तर महाराष्ट्राने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा मोठा टप्पा आता गाठला आहे.

महाराष्ट्राने ५ कोटी लाभार्थ्यांच्या लसीकरणाचा टप्पा पार करत मोठा विक्रम केला आहे. काल म्हणजे १६ ऑगस्टपर्यंत एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. मुंबईमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८३ लाख ८५ हजार १०६ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला तर त्या खालोखाल पुण्याचा नंबर लागतो. ६९ लाख ९० हजार ९४९ पुणेकरांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

तर देशानेही लसीकरणाच्या बाबतीत मोठा टप्पा गाठला असून देशभरात नागरिकांना देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या सोमवारी ५५ कोटींपलीकडे गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

‘लसीकरणाच्या बाबतीत भारताने विक्रमी प्रगती केली असून आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ५५ कोटी मात्रा दिल्या आहेत. करोना विरोधातील भारताचा लढा बळकट करा. लसीकरण करून घ्या!’, असे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सोमवारी केले.

१० कोटींचे लसीकरण पूर्ण करण्यास भारताला ८५ दिवस लागले. २० कोटींच्या लसीकरणासाठी यानंतर ४५ दिवस, ३० कोटींसाठी आणखी २९ दिवस, ४० कोटींचा आकडा पार करण्यास आणखी २४ दिवस लागले. ५० कोटी लसीकरण त्यानंतर २० दिवसांनी, म्हणजे ६ ऑगस्टला पूर्ण झाले. १४ ऑगस्टला हा आकडा ५४ कोटींपलीकडे गेला