'जेईई ऍडव्हान्स' परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'जेईई ऍडव्हान्स' परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी

मुंबई, 27 जुलै (हिं..) अनेक दिवसांपासून पुढे ढकलण्यात आलेल्या 'जेईई ऍडव्हान्स' परिक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षांमधील 'जेईई ऍडव्हान्स' ही परीक्षा ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.ही परीक्षा कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.  केंद्रीय संस्थांतील प्रवेश जेईईच्या गुणांनुसार होतात. जेईई मुख्य परीक्षा आणि 'जेईई ऍडव्हान्स' अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर, 'जेईई ऍडव्हान्स' परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती.