कागलनंतर सोमय्यांच्या रडारवर पारनेर साखर कारखाना!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कागलनंतर सोमय्यांच्या रडारवर पारनेर साखर कारखाना!

अहमदनगर : महाविकास आघाडीवर आरोप करण्यात सोमय्या सर्वात पुढे आहेत. कोल्हापूरमध्ये गोंधळ घातल्यानंतर सोमय्या आता पारनेरकडं निघाले आहेत. पारनेर कारखान्याच्या विक्री गैरव्यवहार प्रकरणी सोमय्या यांनी आज कारखान्याला भेट दिली. कागलचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी आरोपांच्या प्रकरणानं राज्यातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. अशातच आता किरीट सोमय्या पारनेर सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा उघड करण्यासाठी पारनेरमध्ये येत आहेत. परिणामी नगर प्रशासन सतर्क झालं आहे.

सोमय्या यांनी आपण पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीसाठी येत असल्याचं जाहीर केलं होतं. पारनेर सहकारी साखर कारखाना हा पारनेर तालुक्यातील कारखाना आहे. पारनेर भागात या कारखान्याचे सभासद संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं सोमय्या काय खुलासा करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादीचे आहेत. परिणामी सोमय्या त्यांच्यावर काही आरोप करतात का? याकडं सर्वांचं लक्ष आहे. सोमय्या येणार म्हटंलं की गोंधळ होणार. प्रशासन सोमय्या येणार म्हणल्यावर तयारी करत आहे.