एमपीएससी परिक्षार्थींना शनिवारी लोकल प्रवासाची मुभा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एमपीएससी परिक्षार्थींना शनिवारी लोकल प्रवासाची मुभा

मुंबई : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवार, सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढून माहिती दिली आहे. यात परीक्षेसाठी उमेदवारांना लोकलमधून प्रवास करायचा असल्यास त्यांना परीक्षेचे ओळखपत्र तिकिट खिडकीवर दाखवावे लागणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत होत्या. मात्र आता महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट 'साठी ही परीक्षा घेतली जाईल. सध्या दोन डोस झालेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससी उमेदवारांसमोर अडचण होती. अशातच विद्यार्थ्यांना उद्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी होऊ नये म्हणून राज्य सरकारने याबाबत रेल्वे विभागाला पत्र लिहिले होते. या पत्रात विद्यार्थांना प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी सरकारने रेल्वे विभागाला केली होती. सरकारच्या या मागणीला रेल्वे विभागाने आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे परीक्षेला जाणार्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.