मुंबईत मोठी रुग्णघट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत मोठी रुग्णघट

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असून, मुंबईत मोठी रुग्णघट नोंदविण्यात येत आहे. मुंबईत रविवारी ३६२ रुग्ण आढळले, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या खाली नोंदवली जात आहे. तसेच करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी मुंबईत ५३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. झोपडपट्टीतील संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून, रविवारच्या आकडेवारीनुसार, शहरात चाळी आणि ६१ इमारती प्रतिबंधित आहेतदरम्यान, मुंबईत पाचवे सेरो सर्वेक्षण सुरू झाले असून, त्यात शहरातील सुमारे आठ ते दहा हजार व्यक्तींचे नमुने घेण्यात येणार आहेत.

राज्यात ,८४३ नवे रुग्ण मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ,८४३ रुग्ण आढळले असून, १२९ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ,२१२ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ९४ हजार ९८५ आहे. राज्यात दिवसभरात रायगड २२५, पनवेल १२६, पुणे ६५७, पुणे शहर २६७, पिंपरी- चिंचवड १६१, सोलापूर ४०१, सातारा ६६५, कोल्हापूर ५८२, कोल्हापूर शहर १७१, सांगली ६९१, सांगली-मिरज-कूपवाड १६१, सिंधुदुर्ग १६२, रत्नागिरी १९६, बीड २०९ नवे रुग्ण आढळले.