गडचिरोली - नक्षलवादयांकडून शेतकऱ्याची हत्या

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गडचिरोली - नक्षलवादयांकडून शेतकऱ्याची हत्या

गडचिरोली : राहत्या घरातून अपहरण करून एका इसमाची हत्या झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील मुरूमगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केहकावाही गावात घडली आहे .बिरसुराम तुलावी असे मृतकाचे नाव असून तो केहकावाही येथे शेती करीत होता. गुरूवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी त्याचे घरातून अपहरण करून नेल्यानंतर शनिवारी पहाटे त्याची कुऱ्हाडीने हत्या करून त्याचा मृतदेह गावालगतच्या जंगलात टाकला.

नक्षल्यांनी गुरूवारी रात्री त्याला घरून उचलले व जंगलात घेऊन गेले. त्याला प्रचंड मारहाण केली व नक्षलांची माहिती पोलीसांना देतो असा आरोप ठेवून त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह गावाजवळ आणून टाकून दिला. घटनेची माहिती आज सकाळी जंगलाकडे गेलेल्या माणसांना झाली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. प्राप्त माहितीनुसार मृतकाचे शव त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतले. मागील 24 तासात त्या भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गावाजवळचा नाला भरून वाहत होता त्यामुळे शव उत्तरीय तपासणीसाठी किंवा पोलीस कारवाईसाठी आणू शकले नाहीत.