आमिरने फोन करावा, मी कशाला करु – फैजल खान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आमिरने फोन करावा, मी कशाला करु – फैजल खान

बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ फैजल खानने ‘फॅक्ट्री’ या चित्रपटातून दिग्दर्शनातून पदार्पण केले आहे. या चित्रपटात फैजल मुख्य भूमिका देखील साकारत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रोली रायन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशसाठी फैजलने एक मुलाखत दिली होती. यावेळी त्याने आमिरने त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अजून फोन केला नाही असे सांगितले आहे.

फैजलने नुकतीच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने या विषयी सांगितले आहे. “तुझ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला..तर चित्रपटाचा ट्रेलर तू आमिरला दाखवला किंवा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का?’ असा प्रश्न फैजलला विचारण्यात आला. यावर फैजल म्हणाला की ‘त्यांनी पाहिला असेल तर त्यांनी फोन केला पाहिजे आणि सांगितल पाहिजे की त्यांना ट्रेलर आवडला की नाही, माझ्या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे हे मी त्यांना फोन करून सांगण्यात काही अर्थ नाही. मी का फोन करू मी दिग्दर्शक आहे.”

पुढे फैजलला विचारले की अशा काळात प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणायचे म्हणजे खूप कसरत आहे. त्याविषयी तो म्हणाला, “हे कठीण आहे. मात्र, आमच्या चित्रपटात काही चांगल्या गोष्टी आहेत ज्यामुळे प्रेक्षक नक्कीच चित्रपटगृहात येतील. आमच्या चित्रपटात ‘फ्राय डे हो या ड्राय डे’ हे गाणं आहे. हे गाणं जर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल तर प्रेक्षक नक्कीच चित्रपटगृहात येतील. चित्रपटाची कहाणी अप्रतिम आहे. सगळ्या गोष्टी अप्रतिम आहेत.”