काश्मिरात पुन्हा आढळले पाकिस्तानी ड्रोन्स

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काश्मिरात पुन्हा आढळले पाकिस्तानी ड्रोन्स

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील सांबा जिल्ह्यात गुरुवारी रात्री पुन्हा एकदा 3 संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन्स दिसून आलेत. यापैकी दोन ड्रोन्स सैन्य छावणीजवळ तर तिसरे ड्रोन इंडो-तिबेट पोलिसांच्या (आयटीबीपी) छावणीनजीक आढळून आलेत. यावेळी सतर्क असलेल्या जवानांनी या ड्रोन्सच्या दिशेने गोळाबार केला. त्यानंतर हे ड्रोन्स तेथून निघून गेले.
यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी पाकिस्तानच्या दिशेने परतणाऱ्या ड्रोन्सवर चिलाद्या परिसरामधून गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्य दोन डोन्स बारी ब्राह्मणा आणि गगवालमध्ये जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या संरक्षण दलांच्या तळांजवळील संवेदनशील परिसरात फिरत होती. मात्र काही कारवाई करण्याआधीच ही ड्रोन्स दिसेनाशी झाली. या दोन ड्रोन्ससोबतच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स असे लिहिलेला एक फुगा सापडलाय. यावर पाकिस्तानचाही झेंडा देखील आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 27 जून रोजी भारतीय वायूसेनेच्या स्टेशनवर झालेल्या हल्ल्यामध्ये ड्रोन्सचा वापर करण्यात आल्यापासून वारंवार भारतीय सीमेवजळ ड्रोन्स दिसून येत आहेत. मागील काही आठवड्यांमध्ये याचे प्रमाण फार वाढले आहे.