अफगाणीस्थानाहून परतलेल्या 150 भारतीयांचे झाले स्वागत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अफगाणीस्थानाहून परतलेल्या 150 भारतीयांचे झाले स्वागत

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत अफगाणिस्थान येथे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकार अडकलेल्या भारतीयांना स्वदेशात आणण्यासाठी अभियान राबवत आहे. अशाच एका अभियानात 150 भारतीयांचे गुजरातच्या जामनगर येथे मंगळवारी आगमन झाले. या संदर्भात जामनगरच्या खासदार पूनम मदाम यांनी आनंद व्यक्त करीत केंद्र सरकार तसेच वायुसेनचे कौतुक केले.

ट्वीटरद्वारे पूनम मदाम म्हणाल्या, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार अफगाणिस्थानमध्ये अडकलेल्या आपल्या देशवासियांचे संरक्षण करण्यासाठी अहर्निश कार्यरत आहे. या अशा बचाव कार्य अभियानात भारतीय वायुसेनचे सी -17 विमान नवी दिल्लीकडेप्रयाण करीत असताना जामनगर येथे इंधनपूर्तीसाठी दाखल झाले. 150 भारतीयांचे जामनगरमध्ये स्वागत." असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.