3 तासांत रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

3 तासांत रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, 24 जूनजून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अनेक ठिकाणी मान्सूननं दणक्यात आगमन केलं होतं. मुंबईसह संपूर्ण राज्याला मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं होतं. यानंतर आता राज्यात मान्सूनचा जोर कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. पुढील आठवडाभर राज्यात अशीच स्थिती राहिल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांशी राज्यात मोठा पाऊस होणार नसल्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. पण दरम्यानच्या काळात मात्र उत्तरपूर्व भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहेमागील तीन दिवसांपासून उत्तरेत मान्सूनची प्रगती खुंटली आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिमी वार्यांची दिशा लक्षात घेता, भारतात 24 ते 26 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता खूप कमी आहे.