शाळेचं नाही तर मुलांच्या भविष्याचं दार उघडलं; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शाळेचं नाही तर मुलांच्या भविष्याचं दार उघडलं; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद

करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं आज (4 ऑक्टोबर) विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून गेले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मला माझे शाळेतले दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचे दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. शाळेचे नाही तर आज आपण मुलांच्या भविष्याचं, विकासाचं, प्रगतीचं दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.”

मुख्यमंत्री म्हणाले, “शिक्षकांना कधीही आरोग्याबाबत शंका आली तर त्यांनी करोना चाचणी करणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. ऋतू बदलत असतांना साथीचे रोग येत असतात. त्यामुळे या दरम्यान करोना तर आला नाही ना, याची खात्री करुन घेणे महत्वाचे आहे. तसेच शिक्षकांनी काळजी घ्यावी की शिक्षणाची जागा, वर्ग बंदिस्त नसायला हवे, ते उघडे असायला हवे. दारं, खिडक्या उघड्या असायला हव्या, जशे हसते खेळते मुलं तशी खेळती हवा वर्गात राहायला हवी. तसेच सोशल डिस्टंगिंचे पालन करणे, स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.”

“दिड वर्षानंतर शाळा सुरु होतांना. शिक्षक म्हणत असतील अहो आम्हाला थोडं काम करु द्या. सगळं तुम्ही शिकवायला लागले तर आमचे काम काय राहीलं. म्हणून मी काही शिकवण्याचं काम करत नाही. करोनाने आपल्याला काय शिकवलंय याचा अंदाज घेऊन पुढचं आयुष्य आरोग्यदायी व्हावं. हीच जबाबदारी सरकारची आहे. एकदा उघडलेले शाळा बंद होणार या निर्धाराने आजपासून या नवीन आयुष्याची आपण सुरवात करु”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

नियम काय?

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची मंजुरी असणं आवश्यक

विद्यार्थ्यांनी उपस्थिती मोठी असल्यास एक दिवस आड सुरु राहतील

एका दिवशी 15 ते 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश

एका बाकावर एकच विद्यार्थी

सोशल डिस्टन्सिंग राखणं

मास्क घालणं, तसेच सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल

शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत 100 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. करोनाची लस घेतली नाही म्हणून अनुपस्थित राहण्याची मुभा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाही. तर महापौर पेडणेकर यांनी सांगितलं की, “मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं 70 टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांचं लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे.”

राज्य सरकारकडून करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून शाळा पुन्हा कशा सुरु करायच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. स्वतः शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतचं मार्गदर्शन केलं आहे. त्यानुसार त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त यांच्या मान्यतेने राज्यातील जवळपास बहुतांश भागांतील शाळा सुरू होत आहेत.त्याप्रमाणे, आता ग्रामीण भागांत पाचवी ते बारावीचे तर मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत.