शोपियानमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शोपियानमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

श्रीनगर,: जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये आज, शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलेय. पोलिस आणि सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून शोध मोहिम हाती घेतली आहे.

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील रखमा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर सैन्य दलाच्या 34 व्या बटालियनने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने इथे शोध मोहीम राबविली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने चकमक उडाली. सैन्य दलाने प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एक जिहादी दहशतवादी ठार झाला. दरम्यान, परिसरात सैन्य दलाकडून शोध मोहीम राबविली जात आहे.ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षात 7 पाकिस्तानी नागरिकांसह 89 अतिरेक्यांना सुरक्षा दलाने यमसदनी धाडले आहेत.