लखीमपूर हिंसाचार प्रकरण:लखीमपूरला निघालेल्या सिद्धू यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लखीमपूर हिंसाचार प्रकरण:लखीमपूरला निघालेल्या सिद्धू यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा काफिला लखीमपूर खेरीला जाताना यूपी सीमेवरील सहारनपूर येथे अडवण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकरत्यांनी यूपी पोलिसांचे पहिले बॅरिकेड तोडले. यानंतर, पोलिसांनी सिद्धू यांच्यासह अनेक आमदारांना ताब्यात घेतले आहे.

यापूर्वी मोहालीमध्ये सिद्धू यांनी म्हटले होते की, उद्या (शुक्रवार) पर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषला अटक न झाल्यास आपण उपोषण करू. दरम्यान, सपा नेते अखिलेश यादव लखीमपूरला पोहोचले आहेत. त्यांनी मृत लव्हप्रीतीच्या कुटुंबाची भेट घेतली.

आशिषच्या अटकेसाठी छापेमारी

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आणि 3 आरोपींना ताब्यात घेतले. लव, कुश आणि आशिष पांडे यांना अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्राच्या अटकेसाठी पोलिसांचे छापे सुरू आहेत. त्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.

गृहमंत्र्यांच्या मुलाला समन्स

लखीमपूर प्रकरणात आयजी रेंज लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, दोन लोकांना चौकशीसाठी बोलावले होते. दोघांच्या चौकशीत अनेक पुरावे आणि साक्ष मिळाले आहेत. या घटनेतील तीन आरोपींचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावरून कियोस्कही जप्त करण्यात आले आहेत, ज्याची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रालाही चौकशीसाठी बोलावले जाईल.

सर्वोच्च न्यायालयाने स्थिती अहवाल मागितला.

लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला कोंडीत पकडले आहे. न्यायालयाने आतापर्यंतच्या तपासाचा सद्यस्थिती अहवाल उद्यापर्यंत सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. याशिवाय, असे विचारण्यात आले आहे की ज्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता, त्यांना अटक करण्यात आली का? ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध माहिती देण्यात यावी.

तत्पूर्वी, सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा म्हणाले की, न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. आता पुढील सुनावणी उद्या होणार आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात, बहराइच शेतकरी हरी सिंह यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 15 लोकांविरोधात हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यांनी आशिषवर शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप केला आहे.