बुधवारी 45 वयोगटाच्या वरील नागरिकांचे लसीकरण ठराविक ठिकाणीच

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बुधवारी 45 वयोगटाच्या वरील नागरिकांचे लसीकरण ठराविक ठिकाणीच

नागपूर : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत नागपूर शहरात बुधवार ५ मे   रोजी  ४५ वर्षावरील नागरिकांचे  लसीकरण  ठराविक ठिकाणीच होणार आहे. मनपाच्या स्व.प्रभाकरराव दटकेमहाल रोग निदान केंद्रास वगळता इतर केंद्रावर लसीकरण होणार नाही. अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी ही माहिती दिली.

लस उपलब्ध नसल्याने इतर केंद्रांवर लसीकरण होणार नसून योग्य प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण अभियानास  पुन्हा सुरुवात  करण्यात येईलअसे आश्वासनही त्यांनी सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीनची दुसरी मात्रा दिल्या जाईल यासोबत  स्व.प्रभाकरराव दटकेमहाल रोग निदान केंद्रावर  कोव्हॅक्सीन दिल्या जाईल असे ते म्हणाले.

नागपुरात सध्या १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगरपाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहिल. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी डिजिटल  नोंदणी अनिवार्य आहे.  डिजिटल नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावर जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे आणि  केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावीअसे आवाहनही मनपाने केले आहे.

देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा  नूतन- तिसरा टप्पा 1 मे पासून झाला आहे. अठरा  वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली जाणार आहे. याद्वारे मोठ्या आणि व्यापक स्वरूपात लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. 28 एप्रिल पासून या लसीकरणासाठी http://Cowin.gov.in. या संकेतस्थळावर डिजिटल नोंदणी सुरु झाली आहे.