माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स, आता तरी चौकशीला हजर राहणार का? सवाल उपस्थित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स, आता तरी चौकशीला हजर राहणार का? सवाल उपस्थित

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले आहे. देशमुख यांना बुधवारी हजर राहण्यासाठी ईडीने हे समन्स बजावले आहे. आतापर्यंत अनिल देशमुख यांना ईडीमार्फत बजावलेला हा पाचवा समन्स आहे.

ईडीने अटक करु नये यासाठी देशमुख यांनी सर्वाच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिलासा देण्यास न्यायानलायने नकार दिला होता. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मुंबईतील बार, हॉटेल्स आणि ऑक्रेस्ट्रा मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे टार्गेट पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे भ्रष्टाचाराचे आणि गैर कारभाराचे गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केले होते. या आरोपांवरुन आधी सीबीआयने आणि त्यानंतर ईडीने या प्रकरणी गुन्हा दाखल करुन धडक कारवाई सुरु केली.

अनिल देशमुखांनी आतापर्यंत अनेकदा ईडीच्या समन्सला कोणताही प्रतिसाद न देता गैरहजेरी लावली आहे. ईडीमार्फतच्या कारवाईवर अनिल देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही अन्यायकारक अशी कारवाई असल्याचेही म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्यासोबतच त्यांची पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. पण हे दोघेही ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत. आता पुन्हा समन्स बजावला आहे यावेळी तरी देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.