अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बिग बॉस सिझन १३ चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे समजते. मुंबईतील कूपर रूग्णालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या निधनाने टिव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सिद्धार्थने झोपण्यापू्र्वी काही औषधे घेतली होती. मात्र, त्यानंतर तो उठलाच नाही. रूग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. सिद्धार्थने कोणती औषधे घेतली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, रूग्णालयाने सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट केले आहे.
सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच आहे. सिद्धार्थने मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. २००८ मध्ये बाबुल का आंगन छुटे ना या मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. कलर्सवरील बालिका वधू या मालिकेतून त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. २०१४ मध्ये हंम्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातही त्याने भूमिका साकारली होती. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ आणि ‘दिल से दिल तक’मध्येही तो झळकला होता. याशिवाय सिद्धार्थ बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेताही आहे. तसेच त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत.