करण जहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये झळकणार शमिता शेट्टी?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करण जहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये झळकणार शमिता शेट्टी?

बिग बॉस ओटीटीयेत्या ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या शोसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक झाले आहेत. आतापर्यंतच्या सगळ्या सीजनपेक्षा यंदाचा सीजन खूपच क्रेझी ठरणार आहे. जस जसंबिग बॉस ओटीटीची रिलीज डेट जवळ येतेय तस तसं या शोसाठी स्पर्धकांची नावं समोर येताना दिसून येतेय. त्यातच गायक नेहा भसीन हिचं नाव कन्फर्म झालंय. इतर स्पर्धकांच्या नावावर अद्याप कोणतंही कन्फर्मेशन मिळालं नाही. आणखी बरेच लोकप्रिय चेहरे या शोमध्ये झळकणार असल्याचं बोललं जातंय. यात नुकतंच गाजलेल्या राज कुंद्रा प्रकरणात समोर आलेल्या शमिता शेट्टीच्या नावावर सुद्धा चर्चा सुरूयं.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस ओटीटीसाठी बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींना अप्रोच करण्यात आलंय. यात अभिनेत्री मलायका शेरावत हिचं सुद्धा नाव आहे. नुकतंच गाजत असलेल्या राज कुंद्रा प्रकरणात चर्चेत आलेली शमिता शेट्टी हिचा सुद्धाबिग बॉस ओटीटीसाठी अप्रोच करण्यात आल्याचं कळतंय. पण अभिनेत्री शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीमध्ये झळकणार आहे की नाही, याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी संकटात सापडली आहे. एकीकडे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे राज कुंद्रा प्रकरणाची टांगती तलवार अशा अवघड परिस्थितीचा ती सामना करतेय. तिच्या या कठीण काळात शिल्पाची बहीण शमिता शेट्टी तिला आधार देतेय. शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची बहीण आहे. शमिता केवळ शिल्पाचीच नव्हे तर, मेहुणा राज कुंद्राची देखील लाडकी आहे आणि ती त्यांच्याबरोबर बहिणीसमवेत पार्टी किंवा सुट्टीवर जायची.