भारतात 24 तासात 3,26,098 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  3,26,098  नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात  3,26,098  नवे कोरोना रुग्ण आढळले असून  3,890  नागरिकांचा मृत्य झाला आहे.  3,53,299  नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे  2,43,72,907  रुग्ण झाले असून एकूण 2,04,32,898  नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 36,73,802  झाली आहे. देशात मृतांचा आकडा 2,66,207 आहे.

आतापर्यंत देशात 18,04,57,579  नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 16,93,093  नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण  31,30,17,193 चाचण्या घेण्यात आल्या.