Covaxin आणि Covishield चा मिक्स डोस अधिक परिणामकारक: ICMR

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

Covaxin आणि Covishield चा मिक्स डोस अधिक परिणामकारक: ICMR

संपूर्ण जगात करोना विरुद्धच्या लढाईत नव नवे प्रयोग केले जात आहेत. करोना विषाणूविरुद्धच्या लढाईत भारताला आणखी यश मिळताना दिसत आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे संमिश्र डोस दिल्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याबाबतची माहिती दिली आहे. या दोन्ही लसींची समिश्र डोस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचंही निष्पन्न झालं आहे. मिश्र लसीच्या शेवटच्या टप्प्यात चांगले परिणाम दिसल्यास करोना लसीकरण मोहीमेला वेग मिळणार आहे.

वेल्लोरमधील ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजला कोविड-१९ च्या मिश्र चाचणीची परवानगी मिळाली होती. केंद्रीय औषध नियमक मंडळाच्या एका समितीने ही शिफारस केली होती. त्याला मंजुरी दिल्यानंतर चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

  • कोविशिल्डही लस ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाने तयार केली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. या लसीचे ठराविक अंतराने दोन डोस दिले जात आहेत. यूके व्हेरिएंट (B117) आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट (B1351) वर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. भारत सरकारने या लसीला मान्यता दिली आहे.
  • कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे. या लसीचे दोन डोस दिल्यानंतर प्रभावी ठरत आहे. ही लस यूके व्हेरिएंटसह अन्य व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. या लसीला भारतात मान्यता देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. सध्या या लसीचं ते १८ वयोगटातील मुलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.

देशभरात मागील २४ तासात ४३ हजार ९१० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ३९ हजार ७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ४९१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ही ,१९,३४,४५५ झाली आहे. देशात ,०६,८२२ अॅक्टिव्ह रूग्ण असून, एकूण ,०६,८२२ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, आजपर्यंत देशात ,२७,८६२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

6

पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या; सीबीआयचं ठाकरे सरकारला पत्र

पुणे : पुणे-सातारा मार्गावरील रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरकडून जी टोलवसुली केली जात आहे, ती बेकायदेशीर नियमांचं उल्लंघन करून असल्याची तक्रार, आरटीय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सीबीआयकडे केली होती. त्याधारावर आता सीबीआयाने राज्य सरकारला पुणे-सातारा टोलनाक्याची चौकशी करण्याची परवानगी द्या, असं म्हणत पत्र पाठवलं आहे.

जानेवारी २०१६ पासून रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर पुणे-सातारा मार्गावर जी टोलवसुली करत आहे ती बेकायदेशीर आणि नियमांचं उल्लंघन करुन आहे. ही वाहनचालकांची फसवणूक असल्याची तक्रार घेऊन आम्ही सीबीआयकडे गेलो होतो. सीबीआयने त्यावर प्राथमिक चौकशी केली. नियमात बदल झाल्याने सीबीआयने गुन्हा नोंद करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मागितली आहे. एवढी मोठी फसवणूक इतक्या महिन्यांपासून चालू असताना गेल्या दोन -तीन महिन्यांपासून राज्य सरकार सीबीआयला परवानगी देता अडून बसलं आहे. अशी माहिती आरटीय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली आहे. तर, प्रवीण वाटेगावकर यांनी सीबीआयकडे केलेल्या  तक्रारीच्या आधारावर सीबीआयने ठाकरे सरकारला परवानगीसाठी पत्र लिहिलं आहे. या रस्त्यावरील टोल थांबविण्याची मागणीही सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी त्यात वाढ करून रिलायन्सला टोलवाढीचे बक्षीस दिले जात असल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.