“… बस काटते हैं”; रिलीज होताच ‘कुत्ते’ सिनेमाच्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“… बस काटते हैं”; रिलीज होताच ‘कुत्ते’ सिनेमाच्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा

  बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनी त्यांच्या हटके सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. ओमकारा, मक़बूल मकड़ी या सिनेमांसोबतच हैदर आणि कमिने सारख्या गाजलेल्या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलंय. यानंतर आता विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालाय. आसमानने देखील दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. आसमानेन त्याच्या पिहल्या सिनेमाची घोषणा केलीय.

आसमान भारद्वाज दिग्दर्शितकुत्तेया सिनेमाची घोषणा करण्यात आली असून या सिनेमाचं हटके मोशन पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलंय. या सिनेमात अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, राधिका मदान, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

कुत्तेसिनेमाचा फर्स्ट लूक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये एकाही कलाकाराचा चेहरा दिसत नाहीय. त्यांच्या चेहऱ्यांच्या जागी विविध प्रजातींच्या श्वानांचे चेहरे लावण्यात आले आहेत. आसमान भारद्वाजसह सिनेमातील अनेक कलाकारांनी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय. “ना ये भौंकते हैं, ना ग़ुर्राते हैंबस काटते हैंही टॅगलाइन देत सिनेमाचं पोस्टर शेअर करण्यात आलंय. वडील विशाल भारद्वाज यांच्यासोबत आसमानने या सिनेमाची कथा लिहिली आहे. हा एक थ्रीलर सिनेमा असेल. यावर्षाच्या शेवटी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

आसमानने न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केलंय. त्याने वडील विशाल भारद्वाज यांनामटरू की बिजली का मनडोलाआणिपटाखाअशा काही सिनेमांमध्ये असिस्ट केलंय.