सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात - वडेट्टीवार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात - वडेट्टीवार

मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय धक्कादायक आहे. न्यायालयाचा निर्णय म्हणजे कायदाच असल्याने तो देशाला लागू झाल्याने देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आरक्षण कुठल्याही स्थितीत टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. फेब्रुवारी-मार्च २०२२ पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी एम्पिरिकल डेटा गोळा करून आरक्षण टिकवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्र सरकारने केलेली जनगणना व त्याची आकडेवारी, डेटा तातडीने राज्याला द्यावा, अशी राज्य सरकारची मागणी आहे.