जवळच्या व्यक्तीला गमावूनही श्रेया बुगडे करतीये प्रेक्षकांचं मनोरंजन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जवळच्या व्यक्तीला गमावूनही श्रेया बुगडे करतीये प्रेक्षकांचं मनोरंजन

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला आहे. ऑक्सिजन, औषधे यांच्या
कमरतेमुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. अनेक कलाकारांनी आपल्या जवळच्या
माणसांना गमवाले. पण हेच कलाकार स्वत:च्या आयुष्यातील दु:ख विसरुन चेहऱ्यावर हास्य
ठेवत प्रेक्षकांचे मनोरंजन करु लागले. असेच काहीसे अभिनेत्री श्रेया बुगडेसोबत घडले.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून श्रेया प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे.
पण संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या कॉमेडी क्वीनवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे.

या कार्यक्रमातील एका भागामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी श्रेया बुगडेशी गप्पा मारत होता.
दरम्यान त्याने श्रेया कठीण काळातून जात असल्याचे सांगितले आहे. करोनामुळे तिच्या दोन
मावशींचे निधन झाले.
या विषयी कार्यक्रमात बोलताना श्रेया म्हणाली, ‘माझ्या दोन्ही मावशींना करोना झाला होता.
जेव्हा करोनाची पहिली लाट आली तेव्हा आम्ही खबरदारी घेतली होती. पण दुसरी लाट थेट
आमच्या घरावर येऊन धडकली. या लाटेमुळे अवघ्या २४ तासांमध्ये माझ्या दोन्ही मावशींना
आमच्यापासून हिरावून नेलं. मी त्या दोघींची खूप लाडकी होते. त्या दोघी आम्हाला अचानक
सोडून जातील असा स्वप्नातही विचार केला नव्हता. तो खूप मोठा धक्का होता.’