बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे : शिवलीला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे : शिवलीला

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ सध्या ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिझनमध्ये कलाकारांव्यतिरिक्त किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील देखील सहभागी झाल्या आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात ‘नाव मोठे लक्षण खोटे’ हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या नॉमिनेशमध्ये घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर नॉमिनेट करायचे होते. नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. त्यावेळी शिवलीला यांनी ‘बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे’ असे म्हटले आहे.

नॉमिनेशन टास्कमध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तसेच सुरक्षित सदस्यांपैकी कोणता सदस्य नॉमिनेट व्हायला हवा होता हे कारणांसहीत सांगायचे आहे असे जाहीर केले. याच कार्यामध्ये स्नेहा आणि मीनल मध्ये भांडण झाले. आज जय, विकास आणि शिवलीला त्यांची मते मांडताना दिसणार आहेत.