तालिबान्यांकडून अफगाणी सैनिकाची गोळी घालून हत्या

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तालिबान्यांकडून अफगाणी सैनिकाची गोळी घालून हत्या

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती बिकट झाली आहे. नागरिक आपला जीव मुठीत घेवून वास्तव्य करत आहेत. अशातच तालिबानकडून एका अफगाणिस्तानी सैनिकाची हत्या करण्यात आली आहे. घोरबन महंमद अंद्राबी असे या अफगाणी सैनिकाचे नाव होते. माफी मागूनही त्याची हत्या करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी दक्षिण अफगाणिस्तानच्या बागलाण प्रांतातील खानजान भागात राहणाऱ्या अंद्राबी यांना त्यांच्या घरातून जबरदस्ती बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांसमोरच गोळ्या घालून ठार केले. दरम्यान यापूर्वीही तालिबान्यांनी अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांच्या भावाची हत्या केली होती.