बड़े अच्छे लगते हैं’ २ मध्ये साक्षी तन्वर नाही ही अभिनेत्री दिसणार मुख्य भुमिकेत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बड़े अच्छे लगते हैं’ २ मध्ये साक्षी तन्वर नाही ही अभिनेत्री दिसणार मुख्य भुमिकेत

राम कपूर, साक्षी तन्वर यांची प्रमुख भूमिका असणारीबड़े अच्छे लगते हैंमालिका लवकरच १० वर्षे पूर्ण करणार आहे. या मालिकेला एक दशक लोटून गेलं असलं तरी आजही या मालिकेचे अनेक चाहते दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. राम आणि साक्षी यांच्या जोडीने ६४४ भागांमध्ये प्रेक्षकांचे चांगलच मनोरंजन केलं. सोनीवर सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी ही एक मालिका ठरली.

गेल्या काही दिवसांपासून या बड़े अच्छे लगते हैंचा दुसरा सिझन येणार असल्याची चर्चा होती. मात्र नव्या पर्वात साक्षी तन्वरऐवजी दिव्यांक त्रिपाठी प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्पॉट बॉयने दिलेल्या वृत्तानुसार, बड़े अच्छे लगते हैंच्या नव्या पर्वामध्ये दिव्यांक त्रिपाठोसोबत नकुल मेहता प्रमुख भूमिकेत दिसणार आहे

या भूमिकेसाठी निर्मात्यांनी दिव्यांकाची निवड केली असून राम कपूरऐवजी या नव्या पर्वात नकुल मेहताची निवड करण्यात आलीय. नकुलची निवड करण्याआधी मालिकेमध्ये काम करण्यासाठी रामची भूमिका साकारण्यासाठी करण पटेलकडे विचारणा करण्यात आला होती. करण पटेलने यापूर्वीही दिव्यांकासोबत काम केल्याने त्याचा विचार करण्यात आला होता. हे दोघेही यापूर्वी ये हैं मोहब्बतें मालिकेमध्ये एकत्र झळकले होते. या दोघांची जोडी छोट्या पडद्यावर तुफान हीट ठरल्याने हाच हीट फॉर्म्युला बड़े अच्छे लगते हैं साठी वापरण्याचा निर्मात्यांचा विचार गोता. मात्र आता करणऐवजी नकुल दिव्यांका सोबत छोट्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे.

नकुल याआधीइश्कबाजमालिकेत प्रमुख भूमिकेत झळकलेला. दुसरीकडे दिव्यांका कलर्स टीव्हीवरील रिअॅलिटी शोखतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे.