उरी येथे एक दहशतवादी अटकेत, दुसरा ठार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

उरी येथे एक दहशतवादी अटकेत, दुसरा ठार

जम्मू : भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये नियंत्रण रेषेवर भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात आले. या दरम्यान, जवानांनी या कारवाईत अन्य एका दहशतवाद्याला ठार केले आहे.

सैन्याने गेल्या एका आठवड्यात उरी आणि रामपूर सेक्टरमध्ये अनेक ऑपरेशन केले आहेत. पाकिस्तानमधून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखताना सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. सीमेवर मोठे सुरक्षा दले तैनात आहेत. दोन दिवसांत तीन ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.