पालकमंत्री छगन भुजबळ-सेना आमदाराच्या खडाजंगीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपत्कालीन निधीतून मदत देण्याच्या विषयावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव येथे आयोजित आढावा बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर नांदगावातील पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी कांदे यांनी केली होती. पण भुजबळ यांनी कांदे यांना शांत राहण्यास सांगितले होते. यावरून बैठकीत मोठा वाद निर्माण झाला होता. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार यांच्यामध्ये वाद विकोपाला गेला आहे असा सवाल माध्यमांनी संजय राऊत यांनी केला. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. “काही वाद विकोपाला गेलेला नाहीये. दोन्हीही महाविकास आघाडीचेच लोकं आहेत. एकमेकांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. सुहास कांदे निवडणून आलेले आमदार आहेत त्यांचाही सन्मान राखला गेला पाहिजे. छगन भुजबळ पालकमंत्री आहेत त्यांनी या आमदारांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळलं पाहिजे. तरुण मुलं आहेत त्यामुळे सांभाळून घेतलं पाहिजे. चढाओढ अहंकार असता कामा नये तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.