सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देणं मिलिंद सोमणला महागात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देणं मिलिंद सोमणला महागात

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी खास करून ओळखला जातो. मिलिंद सोमणच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावरून मिलिंद त्याच्या फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कायमच प्रोत्साहन देत असतो.

नुकतीच मिलिंद सोमणने नियमित तपासणीचा भाग म्हणून सीटी स्कॅन चाचणी केली आहे. मिलिंदने एक फोटो शेअर करत नियमित तपासणीचं महत्व पटवून देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टवरून आता नेटकऱ्यांनी मिलिंद सोमणला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. या फोटोच्या कॅप्शनध्ये मिलिंद सोमणने बंगळूरुमध्ये त्याचं सीटी स्कॅन झाल्याचं सांगितलं. यावेळी ब्लॉकेजची तपासणी करण्यात आली असून सर्व काही ठीक असल्याचं तो म्हणाला. तसचं डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित सीटी स्कॅन करणं गरजेचं असल्याचा सल्ला मिलिंद सोमण दिलाय.पुढे मिलिंदने लिहिलं, “अन्न, व्यायाम, झोप, तणाव व्यवस्थापनासह आणि नियमित चांगल्या सवयी या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. मग तुमचं वय कितीही असो, प्रत्येक तपासणीच्या वेळी तुमच्या शरीराचं कार्य सुरळीत असल्याचं दिसून येईल.” मिलिंद सोमणने चाहत्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला असला तरी यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.