लॉर्ड्सवर ३१ वर्षांनी क्रिकेटपटू केएल राहुलने घडवला विक्रम

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लॉर्ड्सवर ३१ वर्षांनी क्रिकेटपटू केएल राहुलने घडवला विक्रम

लॉर्ड्स : भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलने कसोटी कारकिर्दीमधील सहावे आणि लॉर्ड्सवरील पहिले शतक २१२ चेंडूत पूर्ण केले. राहुल लॉर्ड्सवर शतक बनवणारा रवी शास्त्री यांच्यानंतरचा भारताचा आघाडीचा पहिलाच फलंदाज बनला आहे. शास्त्रींनी १९९० साली लॉर्ड्सवर शतक झळकावले होते. त्यानंतर ३१ वर्षांनी राहुलने हा विक्रम केला आहे.
तीन वर्षांनंतर केली शतकी खेळी
राहुल दोन वर्षे कसोटी क्रिकेटपासून दूर होता. त्याने तीन वर्षांनंतर कसोटीत शतक झळकावले आहे. यापूर्वी २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना त्याने शतकी खेळी केली होती. ओव्हल मैदानात त्याने १४९ धावांची खेळी केली होती.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. त्यातील पहिल्या डावात भारताचा आघाडीचा फलंदाज राहुलने शतकी खेळी केली. तो सध्या ३८ वा कसोटी सामना खेळत आहे. लॉर्ड्स मैदानात १०७ चेंडूंचा सामना करताना एकही चौकार मारला नाही. त्यानंतर त्याने मोईन अलीच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर राहुलने आक्रमकपणे फलंदाजी करत नऊ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले.

सहा शतके, १४ अर्ध शतके झळकावली
आतापर्यंत त्याने सहा शतके आणि १४ अर्ध शतके झळकावली आहेत. राहुलने सहा पैकी पाच शतके ही परदेशी मैदानावर केली आहेत. आतापर्यंत राहुलने इंग्लंडविरुद्ध दुसरे शतक केले असून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी एक-एक शतक केले आहे.