महाविकास आघाडीतर्फे सोमवारी पुणे बंदचे आवाहन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाविकास आघाडीतर्फे सोमवारी पुणे बंदचे आवाहन

पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे भाजप नेते, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांच्या धडक देऊन चिरडून मारल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ११) महाविकास आघाडीतर्फे पुणे बंदचे आवाहन करण्यात आले आहे.मिश्रा यांचा मुलगा आशिषवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेस पाच दिवस उलटूनही अजून आशिषला अटक झाली नाही. तसेच हरियानात भाजपच्या खासदाराच्या गाडीने शेतकऱ्यांना उडवल्याचीही घटना घडली आहे. सत्ताधारी पक्षाकडूच अशा घटना घडत असल्याने हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात ११ ऑक्टोबरला पुणे बंद असणार आहे. यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्ष संघटनांची बैठक घेण्यात आली.