मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळून एकाचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईच्या काळबादेवी परिसरात ४ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एक खळबळ उडाली आहे. काल रात्री ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच बचाव पक्ष आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

तिसऱ्या मजल्यावर शौचालयाचे प्लास्टर आणि चौथ्या मजल्यावरच्या इमारतीचा भाग कोसळला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून म्हाडाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने ही इमारत रिकामी केली आहे. तसेच या इमारतीच्या आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. शंभर लोकांना बिल्डिंगमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे.