फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत अनोखं रक्षाबंधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत अनोखं रक्षाबंधन

रक्षाबंधन म्हणजे बहीण भावातील प्रेम साजरा करण्याचा दिवस. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. म्हणूनच यालाराखीपौर्णिमाअसे देखील म्हटले जाते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या हातावर राखी बांधते. रक्षाबंधन म्हणजे रक्षा करण्याचे वचनस्टार प्रवाहच्याफुलाला सुगंध मातीचामालिकेत देखील रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र इथे कीर्तीने आपल्या भावाला राखी बांधण्याऐवजी तिच्या भावाने तिला राखी बांधलीय.

कीर्तीचं शौर्य आणि तिच्या धाडसाच्या बऱ्याच गोष्टी आपण मालिकेतून पहात आलोय. नुकतंच तिने आपल्या कुटुंबाला एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यातून वाचवत कौतुकाची थाप मिळवली. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी कीर्तीचा भाऊ सागर तिला राखी बांधून फक्त कुटुंबाचच नाही तर देशाचं रक्षण करण्यासाठी प्रेरणा देतो.

मालिकेतला हा प्रसंग नव्या बदलाची नांदी आहे असं म्हटलं तरी चालेल. कीर्तीने आयपीएस ऑफिसर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. कीर्तीच्या या स्वप्नपूर्तीमध्ये तिला शुभमची कशी साथ मिळणार याची देखील उत्सुकता आहे. त्यामुळेफुलाला सुगंध मातीचामालिकेचे यापुढील भाग अधिकाधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहेत.