दिल्लीला दुसरा धक्का; श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिल्लीला दुसरा धक्का; श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड!

आयपीएल २०२१च्या ४१व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आज आमनेसामने आले आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला केकेआरला हरवण्याची गरज आहे. दिल्लीसाठी चांगली गोष्ट म्हणजे केकेआरचा आक्रमक अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. दिल्ली दहा सामन्यांत आठ विजयांसह १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर केकेआर सहा पराभव आणि चार विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता, तर चेन्नई सुपर किंग्जच्या हातून केकेआरला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आजच्या सामन्यात कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पृथ्वी नसल्यामुळे शिखर धवनसोबत स्टीव्ह स्मिथने सलामी दिली. चांगल्या लयीत खेळणाऱ्या धवनला लॉकी फर्ग्युसनने पाचव्या षटकात झेलबाद केले. धवनने स्मिथसोबत ३५ धावांची सलामी दिली. धवनने आपल्या २४ धावांच्या खेळीत ५ चौकार ठोकले. त्यानंतर आलेला मुंबईकर श्रेयस अय्यर पुढच्याच षटकात सुनील नरिनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.

दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी आज कोलकाताकडून पदार्पणाचा सामना खेळत आहे. मागच्या सामन्यात महागडा ठरलेल्या प्रसिध कृष्णाऐवजी संदीप वॉरियरला संघात स्थान देण्यात आले आहे. तर दिल्लीने दुखापतग्रस्त पृथ्वी शॉबदली स्टीव्ह स्मिथला संघात घेतले आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स – शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, टिम साउदी, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि लॉकी फर्ग्युसन.