हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर आघाडीवर, मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हेल्मेट न घालण्यामध्ये पुणेकर आघाडीवर, मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई : दुचाकी चालवताना हेल्मेट घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत 80 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्र ट्रॅफिक विभागाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वधिक कारवाया या पुण्यात झाल्या असून हेल्मेट घालण्यामध्ये पुणेकर पहिल्या तर मुंबईकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या 5 महिन्यात 16.15 लाख लोकांवर विना हेल्मेट गाडी चालवणे संदर्भात दंड आकारण्यात आला असून यांच्याकडून 80 कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये 7.45 लाख लोकांकडून दंड आकारण्यात आला आहे. तर, मुंबईमध्ये ही संख्या 3.9 लाखांवर आहे. ठाण्यात 78,346 लोकांकडून दंड आकरण्यात आला आहे. लोकांनी जास्तीत जास्त नियमांचे पालन करण्याचे आवाहन महाराष्ट्र ट्राफिक हायवे विभागाचे एडीजे भूषण उपाध्याय यांनी यावेळी केले आहे.

हिंदुस्थान समाचार