आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय - जयंत पाटील

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय - जयंत पाटील

पुणे : आज पुण्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती झाली. 'मंदिर उघडण्यात आले आहेत, हा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पुन्हा कोरोनाची लागण होऊ नये, महाराष्ट्र सुरक्षित रहावा हीच गणपती चरणी प्रार्थना केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हाणाले, राज्यात आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षढयंत्र भाजप करतंय करत आहे. भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्या पाठोपाठ ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स येते. भाजपनं राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतलाय..?, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी केला. आमचा कायद्यावर विश्वास आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांना असाच त्रास देण्यात आला, यांनाही न्याय मिळाला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

'आमचे राष्ट्रवादीचे नेते निर्दोष आहेत, त्यांना बदनाम केलं जातंय. धाडसत्र चालवण्याचा या व्यवस्थेचा हेतू आहे. या देशातल्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही! इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही जंयत पाटील यांनी सांगितले.