मुंबई: डोंगरीतून 15 कोटींचं हेरॉईन जप्त

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई: डोंगरीतून 15 कोटींचं हेरॉईन जप्त

केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने २ ऑक्टोबरपासून सुरु केलेल्या धाडींचं सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु आहे. आज मुंबईमधील डोंगरी भागामध्ये टाकलेल्या एका छाप्यामध्ये एनसीबीने दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सात किलो अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमंतलीपदार्थ विरोधी पथकाच्या मुंबईमधील तुकडीने सात किलो हेरॉईननसहीत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईमधील डोंगरी भागामध्ये ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये १५ कोटी रुपये इतकी आहे.

कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा मुंबईमध्ये एनसीबीचं धाडसत्र सुरु झालं. यामध्ये आधी पवईतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. अंकित कुमार असं पवईमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडेही अंमलीपदार्थ आढळून आले आहेत. मंगळवार रात्रीपासून एनसीबीकडून वांद्रे, जुहू आणि गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत.