बृहन्मुंबई‌ ‌महानगरपालिकेतर्फे‌ ‌७५‌ ‌वा‌ ‌स्वातंत्र्यदिन‌ ‌साजरा‌ ‌

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बृहन्मुंबई‌ ‌महानगरपालिकेतर्फे‌ ‌७५‌ ‌वा‌ ‌स्वातंत्र्यदिन‌ ‌साजरा‌ ‌

मुंबई : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईच्या महापौर किेशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दि. १५ ऑगस्ट २०२१) सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर किेशोरी किशोर पेडणेकर यांनी समस्त मुंबईवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी उप महापौर अॅड. सुहास वाडकर, महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल, माजी महापौर तथा नगरसेविका श्रीमती श्रध्दा जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री.पी.वेलरासू , सह आयुक्त, उपायुक्त, खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त, इतर अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. महापालिका मुख्यालयाच्या आवारातील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळयास महापौर किेशोरी किशोर पेडणेकर यांनी प्रारंभी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर मा. राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा शौर्यपदक जाहीर झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱयांचा महापौर किशोरी पेडेणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये उप आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी) श्री. हेमंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. आत्माराम मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी श्री. कृष्णात यादव यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मा. आयुक्तांचे अतुलनीय शौर्याबद्दलचे रजत पदक बहाल करण्यात आलेले केंद्र अधिकारी श्री. अनिल पवार तसेच अग्निशामक श्री. बाळासाहेब राठोड यांचा समावेश आहे.
याप्रसंगी महापालिका चिटणीस खात्यातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱया ‘ वार्षिक प्रकाशन’ २०२१ चे महापौरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. यानंतर ‘बाबासाहेब वरळीकर’ यांच्या ४९ व्या स्मृतीदिनानिमीत्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.